शालेय विद्यार्थ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये इंग्रजी विषया साठी स्पेलिंग बी स्पर्धांचे आयोजन.


धाराशिव(प्रतिनिधी) जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषया साठी स्पेलिंग बी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जून व जुलै महिन्यात शाळा स्तरावर प्रत्येक शनिवारी या स्पेलिंग बी शब्दांचा सराव घेण्यात आला असून शाळा स्तरावर दिनांक १ ऑगस्ट पासुन ४ ऑगस्ट पर्यंत स्पर्धा घेण्यात येणार आहेत तसेच परंडा तालुक्यातील बीट स्तरावर दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत १ ली ते ८ वी मधील प्रत्येक वर्गातील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळणारे विद्यार्थी बीट स्तरावर स्पर्धेत सहभागी होणार आहेत बीट स्तरावरून वर्ग निहाय प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी दिनांक ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तालुक्यातील स्पर्धेत प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी जिल्हा स्तरावर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. परंडा तालुक्यातील तालुकास्तरीय स्पर्धा दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथे सकाळी ठीक ११ वाजता होणार आहेत.
जिल्हा स्तरावर स्पर्धा दिनांक १३ ऑगस्ट रोजी होणार असून स्पर्धेत प्रावीण्य मिळणार्‍या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन समारंभ कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याचे मा. पालकमंत्री,मा.जिल्हाधिकारी , मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करणार आहेत.
परंडा तालुक्यातील या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके साहेब व विस्तार अधिकारी महादेव विटकर यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेऊन मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक म्हणून साधन व्यक्ती अरविंद बाराते यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!