सोनारी ता. परंडा येथील जनता दरबारास नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद..

परंडा:- भारतीय जनता पार्टी च्या वतीने नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील सोनारी पंचायत समिती गणात सोनारी येथील ग्राम पंचायत सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी १४७ लेखी तक्रारींची दखल घेतली तर काही तक्रारींची भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करीत तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
या जनता दरबारात येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भाजपा च्या वतीने प्रत्येक विभागांचे‌ प्रमुख नेमण्यात आले असून सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.
या आयोजित जनता दरबारात भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब, तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, सोनारी गावचे सरपंच सुभेदार परमेश्वर मांडवे, परंडा पं.स. माजी उपसभापती संभाजी सुरवसे, माजी उपसरपंच अंगद फरतडे, सुखदेव टोंपे, बिभीषण हांगे, तुकाराम हजारे, दत्ता ठाकरे, श्रीमंत शेळके, बाबासाहेब जाधव, धनाजी गायकवाड, सारंग घोगरे, निशीकांत क्षिरसागर, साहेबराव पाडुळे, श्रीराम देवकर, हरी शिंदे, डॉ. अमोल गोफणे, विलास खोसरे, जोतीराम गिरवले, बाळासाहेब गिरी, फारुख मुलाणी, अजित काकडे, बापुसाहेब कोळी, अर्जुन कोलते, शरद कोळी, तुषार नेटके, नागेश गर्जे, राहुल फले, आकाश गुळमिरे, धिरज हांगे, अभिषेक हांगे, जयंत सायकर, धनंजय काळे, मनोहर पवार, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, कार्तीक दिक्षित, हरी देवकर तसेच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!