शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई ; परंडा तालुक्याती पुरग्रस्त देवगाव ( खु ) येथे आरोग्य तपासणी.

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई महाराष्ट्र राज्य परंडा तालुक्याती पुरग्रस्त देवगाव ( खु ) येथे दि. २६ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गेली चार पाच दिवसा पुर्वी झालेल्या पावसाने परंडा तालुक्यात अतिवृष्टीने मोठी दाणदाण उडवली होती. या आतिवृष्टी मुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले . आनेकांचे संसार पाण्यात गेले, शेतीचे मोठे नुकसान झाले, गाया – म्हशी आदी पशुधन वाहुण गेले.
पुरग्रस्त ग्रामस्थां समोर अन्नधान्यासह आरोग्याचा प्रश्न आठाकुन उभा राहीला आहे. पुरग्रस्ताना अन्नधान्न्यासह आरोग्य सुविधा मिळणे गरजचे होते. या दृष्टीकोणातुन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई महाराष्ट्र राज्य व साई संजीवीनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्याती पुरग्रस्त देवगाव ( खु ) येथे दि. २६ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मिळालेल्या माहीती नुसार यावेळी एकुण २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली आसुन त्यांना औषधाचे देखील वाटप करण्यात आले आहे. या शिबीरासाठी विषेश कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, डॉ. राहुल मांजरे, डॉ. सचिन मांजरे, रामहरी राऊत, डॉ. बरबडे, डॉ. विजय खुने व सुर्व स्टापचे सहकार्य लाभले.

या शिबीरास जिल्हाधिकारी किर्ति कुमार पुजारी ‘ रेवैय्या डोंगरे, तहसिलदार काकडे,बिडिओ चकोर,पोलिस पथक, शिवसेना वैधकिय मदत कक्ष सदस्य आयोजक उमेश सोनवणे,योगेश पाटील आदीनी प्ररिश्रम घेतले .

error: Content is protected !!