दिव्यांगाला शिवसेनेच्या वतीने फिरती खुर्ची भेट

करमाळा (प्रतिनिधी) वीट येथील ज्ञानेश्वर पवार याचे दोन्ही पाय अपंग असल्यामुळे त्याला हातावर खरडून चालावे लागत होते याला मदत म्हणून शिवसेनेच्या वतीने आज चार चाकी सायकल देण्यात आली असून याचे वितरण जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले

आत्तापर्यंत शिवसेनेच्या वतीने 30 दिव्यांग बांधवांना अशा चालत्या फिरत्या खुर्च्या देण्यात आल्या असून अनेकांना कृत्रिम हात पाय देण्यात आले आहेत

यानंतर बोलताना ज्ञानेश्वर पवार म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत दादा शिंदे यांच्या माध्यमातून आज मला ही पंधरा हजार रुपये किमतीची खुर्ची मिळाली असून
आता मला जमिनीवर खरडून चालायची गरज नाही
खरंच माझ्या मदतीला शिंदे धावून आले असून नक्कीच त्यांना माझ्यासारख्या दिव्यांगांचा आशीर्वाद मिळून ते पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला

error: Content is protected !!