परंडा(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील शेळगाव येथे एका ग्रामपंचायत अभिलेख खरेदी खताच्या बेकायदेशीर खडाखोड करून क्षेत्र कमी केल्याची तक्रार केल्याने एका महिलेला गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक सेवकांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. अश्विनी मगर असे या पिढीत महिलेचे नाव असून प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून एका महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे जमिनीचा वाद
अश्विनी मगर यांच्या आजोबांनी गावातील गावठाण हद्दीतील जमीन एका व्यक्तीकडून रीतसर खरेदी केली होती ज्यावेळी ही जमीन विकत घेतली होती त्यावेळी तिचे क्षेत्रफळ जास्त होते मात्र कालांतराने या जमिनीत बेकायदेशीरपणे खडाखोड उत्खनन किंवा बदल करण्यात आला यामुळे आजोबाच्या हक्काच्या जमिनीचे क्षेत्र कमी झाले असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या स्वतःच्या अन्यायाविरुद्ध अश्विनी मगर यांनी संबंधित विभागाकडे रीतसर तक्रार केली
सरपंच पती ग्रामसेवकाकडून दबाव
जमिनीत झालेल्या या फेरफाराची आणि नुकसानेची तक्रार केल्याने राग मनात धरून गावच्या सरपंच पती आणि ग्रामसेवकाने आश्विनी मगर यांना लक्ष करण्यास सुरुवात केली केलेली तक्रार मागे घे अन्यथा तुला सरकारी कामात अडथळा आणल्याच्या किंवा अन्य खोट्या गुन्ह्यात अडकू अशा शब्दात त्यांना धमकवण्यात आले एका महिलेने आपल्या हक्काच्या जागेसाठी कायदेशीर लढा सुरू केला असताना तिला सहकार्य करण्याऐवजी चक्क धमकावल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे
वरिष्ठ स्तरावर चौकशीची मागणी
याप्रकरणी अश्विनी मगर यांनी वरिष्ठ प्रशासनाकडे धाव घेतली आहे आमच्या हक्काच्या जमिनीत खडाखोड करून ती कमी करण्यात आली आहे या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवला तर सरपंच आणि ग्रामसेवक सत्तेचा गैरवापर करून मला धमकावत आहेत असा आरोप अश्विनी मगर यांनी केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.