परंडा (प्रतिनिधी) परंडा उपजिल्हा रुग्णालयात नेहमीच डॉक्टरची उपस्थिती बाबत तक्रारी नागरिकामधून येत असतात. यामधून असाच प्रकार शनिवारी एक चिमुकली मुलीसोबत घडला.
काय आहे प्रकार : परंडा शहरातील एका लहान चिमुकलीला रेबीज चावलेला दुसरा डोस शनिवारी सायंकाळी डोस मिळाला नाही ! या ठिकाणी कोणीही परमनंट डॉक्टर ओपीडीला बाह्य विभागाला बसत नाहीत त्यात अंतर्गत विभागांमध्ये आयपीडी यामध्ये सुद्धा दखल घेतली जात नाही. शनिवारी संध्याकाळी जर पेशंटला इंजेक्शन दिलं नाही ! दुसऱ्या दिवशी रविवार आणि तिसऱ्या दिवशी सोमवार या दिवशी मुलीला डोस दिला जातो. जर ह्या मुलीला वर्तमानात भविष्यात रेबीज आजार झाला तर ती मृत्युमुखी पडू शकते याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांनी केला आहे
सध्या ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे :- रेबीज हा जीव गेला आजार असल्याने त्याचा डोस वेळेवर मिळणे हा रुग्णांचा अधिकार आहे जर वेळेवर मिळाला नाहीत आणि त्यामुळे काही अघटीत घडले तर याच जबाबदार कोण असू शकते?
वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि डॉक्टरची उपलब्ध सुनिश्चित करण्याची जबाबदारी असते परंतु याकडे यांचे नेहमीच दुर्लक्ष असते. संबंधित डॉक्टर ड्युटीवर होते का जर आयपीडी मध्ये डॉक्टर असून देखील दखल घेतली नसेल तरीही वैद्यकीय निष्काळजी मानली जाते.
वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयावर त्वरित नियंत्रण ठेवून ग्रामीण भागातील शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा सुरळीत पुरवाव्यात अशी मागणी ग्रामस्थ नागरिक रुग्णांच्या वतीने करण्यात येत आहे.