परंडा तालुक्यात संत रोहिदास महाराज जयंतीचा ; सर्व शासकीय कार्यालयाला पडला विसर.

माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके)  परंडा तालुक्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत शासकीय कार्यालयांनी दाखवलेली अनास्था ही समाजमन दुखावणारी बाब ठरली आहे. परंडा पंचायत समिती गटशिक्षण कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता जयंती साजरी न केल्याची दिसून आले.या संदर्भात समोर आलेली महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

  • शासकीय अनास्था: परंडा तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन किंवा जयंती कार्यक्रम पार पडला नाही, असा आरोप स्थानिक समाजबांधवांकडून करण्यात आला आहे.
  • प्रशासनाची भूमिका: नियमानुसार थोर पुरुषांच्या जयंत्या शासकीय कार्यालयात साजरा करणे बंधनकारक असतानाही, अनेक कार्यालयांना याचा विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे.
  • समाजबांधवांची प्रतिक्रिया: संत रोहिदास महाराज हे केवळ एका समाजाचे नसून संपूर्ण मानवतेचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे प्रशासनाने दाखवलेला हा ‘विसर’ त्यांचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. – चर्मकार संघटना तालुका अध्यक्ष कानिफनाथ सरपने.
error: Content is protected !!