डॉ.वेदप्रकाश पाटील संकुलातील संत मीरा पब्लिक स्कूल, ‘बाल – दिंडी सोहळा संपन्न

परंडा (तानाजी घोडके)शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल या शाळेत बाल वारकरी दिंडीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी वारकरी वेशात शाळेत आले होते. महाराष्ट्रातील लोकपरंपरा, सांस्कृतीक उत्सव, वारीतील अनुभव, आनंद व मनोरंजन याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच भजन, कीर्तन, संगीत व त्यासाठी वापरले जाणारे साहित्य इत्यादी सर्व गोष्टीचे आकलन विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळावे यासाठी सहशालेय उपक्रमांतर्गत शाळेत या वर्षी आषाढी एकादशी निमित्त ‘बाल -दिंडी’ हा उपक्रम हाती घेतला होता. इ. नर्सरी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थी सकाळपासूनच वारकरी वेशात आले होते, त्यामुळे शालेय वातावरण वारीमय, भक्तिमय व आनंदी होऊन गेले होते. पालखी, टाळ, मृदंग, पताका, झेंडे, तुळशी इ.सर्व साहित्य मुलांनी आणले होते. प्रारंभी सतीश दैन, किशोर चौतमहाल, वैभव पाटील, आकाश बनसोडे, ज्ञानेश्र्वर शिंदे, सागर विटकर इत्यादी पालकांच्या हस्ते प्रतिकात्मक पालखी पूजन करून विद्यार्थ्यांची बाल – दिंडी भजन, देशभक्तीपर गिते गात व लेझीम खेळत पालखी व विठ्ठल रुक्मिणी चा रथ करमाळा चौक येथ पर्यंत काढण्यात आली. कधी उन कधी, कधी सावली पडत होती, अशातही विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिंडीचा प्रचंड आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी यावेळी अनेक प्रकारचे खेळ करून दाखवले. प्राचार्य संतोष भांडवलकर यांच्या नियोजनानूसार, सांस्कृतिक विभाग, बाल- दिंडी कमिटी, बालाजी गोरे, सर्व शिक्षक व कर्मचारी, मृदूंग वादक, गायक यांच्या परिश्रमामुळे सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!