ज्ञान मिळविण्यासाठी वाचन महत्त्वाचे – डॉ शहाजी चंदनशिवे.

परांडा दि. 15(माझं गांव माझं शहर) ज्ञान मिळविण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे वाचन केल्याशिवाय या जगातील कोणतीही माहिती घेणे शक्य नाही. देशातील महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्यांचे कार्य माहित करून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. परंतु अनेक लोक वाचनापासून दूर आहेत. समाजात होत असणाऱ्या विविध घटना अंधश्रद्धा अन्याय अत्याचार कायद्याची माहिती या सर्व गोष्टी माहिती करून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा जिल्हा धाराशिव येथे डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्म दीवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने यांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ शहाजी चंदनशिवे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख वाणिज्य विभागाचे प्रा डॉ संतोष काळे प्रा तानाजी फरतडे प्रा वरपे शिक्षकेतर कर्मचारी अनिल जानराव वसंत राऊत भागवत दडमल विशाल नलवडे रामराजे जाधव दत्ता आतकर यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरीष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!