माझं गांव माझं शहर (दि.३नोव्हेंबर ) आई-वडीलांच्या कष्ठाची जानीव,जिद्द,चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी पुत्र रामलीग भगवान भांगे यांनी क्लास १ गटविकास अधिकारी पदाला गवसनी घालून सिद्ध केले आहे.
सद्या नुकताच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला असून यात वाकडी येथील शेलकरी पुत्र रामलीग भगवान भांगे यांची क्लास १ गटविकास अधिकारीपदी निवड झाली आहे. रामलीग भांगे यांच्या घरची आर्थीक परिस्थिती बेताची मुलगा शिकुन मोठा आधिकारी व्हावा हे स्वप्न उराशी बाळगुन आई- वडीलांनी शेतात काबाडकष्ठ करून पुत्र रामलीग भांगे यांना शिकवीले रामलीग भांगे यांनी आई-वडीलां च्या कष्ठाची जानीव,जिद्द,चिकाटी आणि आभ्यास सातत्य ठेवत क्लास १ गटविकास अधिकारी पदाला गवसणी घालत आई- वडीलांचे मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
रामलिंग भांगे यांच्या कुठूंबाची आर्थीक परिस्थिती बेताची आसल्याने त्यांनी एमपीएससीचा आभ्यास करताना आर्थीक खर्च भागावा यासाठी लाज न बाळगता एटीएम सेन्टरवर सेक्युरेटी गार्डची नौकरी करून आर्थिक खर्च भागवत असे.
रामलीग भांगे यांचे १ ली ते ४ पर्यतचे शिक्षण वाकडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर ५वी ते १० वी चे शिक्षण बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयात झाले आहे. पदवीचे शिक्षण बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयात घेतले आहे.रामलीग भांगे यांनी एमपीएससीचा अभ्यास कोल्हापूर विद्यापीठात केला आहे.स.न २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परिक्षत रामलिंग भांगे यांची एकाच वेळी पीएसआय, एसटी आय,एएसओ,एक्साईज पीएसआय पदी निवड झाली होती.
सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परिषत राज्यात ४६ क्रमांक पटकावत रामलिंग भांगे यांनी क्लास १ गटविकास अधिकारी पदाला गवसनी घातली आहे. ग्रामिन भागातील शेतकरी पुत्र रामलीग भांगे यांची क्लास १ गटविकास अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे वाकडी सह तालुक्यातून अभिनंदन होत आहे.