आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतामध्ये रामानुजन यांची गणना – डॉ विद्याधर नलवडे.


मराठवाडा (प्रतिनिधी)आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतांमध्ये रामानुजन यांची गणना होते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले . असे प्रतिपादन महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. शिक्षण महर्ष गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी महान गणितज्ञ रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख बावची विद्यालय परंडा येथील मुख्याध्यापक नारायण खैरे महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक गोवर्धन गरड मासाळ सर तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील सर्व सहशिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ विद्याधर नलवडे म्हणाले की आपल्या प्रतिभेने आणि समर्पणाने त्यांनी गणिताच्या क्षेत्रात केवळ अद्भुत शोध लावले नाहीत तर भारताला अतुलनीय वैभव मिळवून दिले.तो लहानपणापासूनच विलक्षण प्रतिभावान होता.
यावेळी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये श्रुती विश्वास बोकेफोडे प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय, प्राची आप्पा मदने महात्मा गांधी विद्यालय द्वितीय क्रमांक, प्राजक्ता शिवचरणसिंग राजपूत तृतीय क्रमांक तेजस कैलास मोरे बाऊची विद्यालय चौथा क्रमांक बावची विद्यालय आलिया मौला पठाण बावची विद्यालय पाचवा क्रमांक क्रमांक असे यश संपादन केले.
याप्रसंगी बावची विद्यालय परंडा येथील मुख्याध्यापक नारायण खैरे व महात्मा गांधी विद्यालय परंडा येथील शिक्षक गोवर्धन गरड यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभागाच्या प्राध्यापिका संपदा नलवडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले तर आभार प्राध्यापिका सौ परवीण मोरवे यांनी मानले. याप्रसंगी गणित विभागाच्या सर्व कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक उपस्थित होते.

error: Content is protected !!