परंडा तहसील कार्यालयासमोर कंडारी येथील राजेंद्र पाटील यांचे आमरण उपोषण; पाचव्या दिवशीही प्रशासन खडबडून जागे .

परंडा (प्रतिनिधी): येथील रहिवासी राजेंद्र उत्रेश्वर पाटील यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात परंडा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरू आस्ताना धक्कादायक बाब म्हणजे, उपोषणकर्त्याची प्रकृती बिगडल्यामुळे परंडा उप रुग्नालयचे .डॉ पठान यांनी कर्मचारी सोबत घेऊन उपोषन कार्यकर्ताची तपासणीकेली त्या तपासनी करून ब्टेटमेंट चालू करू असे सांगितले . अद्याप प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतले , नाही व लेखी आश्वासन दिलेले नाही.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी येथील राजेंद्र पाटील यांची वैयक्तिक भिंत राहत्या घराचे भींत नामदेव देशमुख आणि अतुल देशमुख या दोघांनी पाडली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या कृत्यामुळे आपले आर्थिक नुकसान झाले असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी वारंवार केली होती. मात्र, स्थानिक स्तरावर दाद न मिळाल्याने त्यांनी अखेर तहसील कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
प्रशासकीय उदासीनता:
पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. “जोपर्यंत मला न्याय मिळत नाही आणि संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही,” असा पवित्रा राजेंद्र पाटील यांनी घेतला आहे. उपोषणस्थळी अद्याप कोणीही फिरकले नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आगामी काळात प्रकृती अधिक बिघडल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आता तरी संबंधित अधिकारी जागे होऊन पाटील यांना न्याय देणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!