विधानभवना मध्ये राडा : वंचित बहुजन आघाडीची कारवाई ची मागणी.

Img 20250718 wa0038

परंडा १८ (प्रतिनिधी) लोकशाहीला काळीमा फासणारी निंदनीय घटना महाराष्ट्र राज्यातील विधानभवना मध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटने संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी वंचित बहुजन आघाडी चे निवेदन.
       महाराष्ट्र राज्यातील विधान भवनामध्ये विधानसभा,विधान परिषद सदस्यांचे राज्याच्या जनतेच्या विविध प्रश्नां संदर्भात अधिवेशन चालू असून गुरुवार दिनांक १७ जुलै२०२५  रोजी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली विधानभवनाच्या मोकळ्या जागेत आमदार समर्थक कार्यकर्ते यांच्यामध्ये घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय असून लोकशाहीची विटंबना करणारा आहे संविधानाची मूल्य विसरून कांही लोकप्रतिनिधींचे वर्तन देखील या घटनेस जबाबदार आहे सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर विधानभवना मध्ये चर्चा करण्यासाठी देखील वेळ कमी पडतो पण अशा निंदनीय घटनांमुळे विधिमंडळाचा अर्थ वेळ वाया जातो अशा घटना विधिमंडळात फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये घडणे दुर्दैवी आहे त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींसह सर्वांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत जेणेकरून अशा प्रकारचा निंदनीय प्रकार यापुढे घडणार नाही यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परंडा यांच्याद्वारे विधानसभा अध्यक्ष / विधानपरिषद सभापती विधान भवन महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली कारवाईची मागणी याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हाउपाध्यक्ष मोहन बनसोडे, संतोष हिवरे,रवींद्र शिंदे, जानकीराम कळंबकर,राहुल पवार,रुपाली राहुल पवार, उषाबाई ऐवर्डी पवार उपस्थीत होते

Leave a Reply

error: Content is protected !!