परंडा (प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी ०१ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे मराठी विभागाचे प्रा डॉ गजेंद्र रंदिल याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. या जयंती निमित्त प्रा बि.डी. माने व प्रा विजय जाधव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित आपले व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर प्रा किरण देशमुख यांनी आभार मानले. याप्रसंगी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.