, परंडा(MY VILLAGE MY CITY )बावची विद्यालय, परंडा . या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर विविध मॉडेल्स व प्रयोग सादर करून आपली वैज्ञानिक दृष्टीकोन व कल्पकता दाखवून दिली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे सर यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
इयत्ता ५ वी मधून प्रथम क्रमांक डोके राज प्रमोद व बुलबुले युवराज संतोष (Magic Ball), द्वितीय क्रमांक शेख मोहम्मद नवाज मुदस्सर व जेधे कुबेर आकाश (Phases of Moon), तर तृतीय क्रमांक शिंदे भार्गवी महेश (Life Cycle of Plant) यांनी मिळविला.
इयत्ता ६ वी मधून प्रथम क्रमांक वळवी शौर्य सुरज, दोरगे समर्थ दिपक, तिंबोळे संग्राम दादासाहेब व शेख सलमान (How to Prevent Accident), द्वितीय क्रमांक शिंदे तन्मय बालाजी, बुलबुले संस्कार सागर, मशायक मुस्तकिम मुज्जमिल व राऊत दिग्विजय युवराज (Traffic Signals), तर तृतीय क्रमांक भिस्ते सार्थक व जाधव ऋतुराज (Water Fall) यांनी मिळविला.
इयत्ता ७ वी मधून प्रथम क्रमांक संभव शंकर पवार व अभिनव लक्ष्मण ढगे (Air Filtering), तर द्वितीय क्रमांक अक्षरा माधव तिडके, मृण्मयी अभय कुलकर्णी, श्रावणी अमोल पोळ व श्रद्धा दत्ता कांबळे (A Blind Stick) यांनी मिळविला.
इयत्ता ८ वी मधून प्रथम क्रमांक क्षिरसागर सोहम कांतीलाल व काशीद वेदांत धनाजी (Laser Security System), तर द्वितीय क्रमांक बुरंगे आदर्श दत्तात्रय (Solar Electric Power Plant) यांनी मिळविला.
या कार्यक्रमासाठी सर्व विज्ञान शिक्षक, इतर शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत झाली.