प्रविण रणबागुल यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली मदत;ओला दुष्काळ जाहीर करा

भुम/परंडा – दि. २४(प्रतिनिधी) भूम-परंडा तालुक्यात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि नद्यांना आलेला महापूर निसर्गाचा कोप यामुळे तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी या अस्मानी संकटामुळे संकटात सापडला असून शेतकरी बांधवांना धिर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतातील माती वाहून गेली आहे.अनेक जनावरे या पुरामध्ये वाहून गेली तर काही गोठ्यामध्ये बांधलेली असल्यामुळे वाढलेल्या पाण्यामध्ये दगावली शेतात घरात असलेल्या अन्नधान्याचं प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामुळे शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकरी राजाला आर्थिक मदत करावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांसोबत आम्ही भक्कमपणे उभे आहोत हा विश्वास दिला यावेळी प्रविण रणबागुल यांच्या वतीने या संकटाच्या काळात सामाजिक दायित्व म्हणून पूरग्रस्त शेतकरी बाधिवांना रोख रक्कम स्वरूपात मदत दिली..

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना प्रवीण रणबागुल


अशा परिस्थितीत सरकारने संवेदनशीलत दाखवत सरसकट ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड,युवक आघाडी परंडा तालुकाध्यक्ष रणवीर निकाळजे,युवा नेते संतोष हिवरे,ज्येष्ठ नेते उत्तरेश्वर बापू ठवरे,रघुनाथ गावडे ,नवनाथ गावडे,किशोर गायकवाड, रियाज शेख,योगेश आवळे,उमेश आवाळे व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!