परंडा(माझं गांव माझं शहर) छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांना शेलार मामा यांचे वंशज राहुल दादा शेलार यांच्या वतीने ४६ वा पुरस्कार पद्मश्री अगूस इंद्रा उदयाना (अध्यक्ष-गांधीपुरी आश्रम, इंडो्नेशिया बाली) यांच्याशी शुभहस्ते देण्यात आला आहे.
संस्थापक अध्यक्ष शिवभक्त प्राणजीत शोभा नवनाथ गवंडी
छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने आतापर्यंत महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, मध्ये प्रदेश, उत्तर प्रदेश,४९८ गडकिल्ले व पुरातन मंदिर साफसफाई स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या आहेत , आतापर्यंत पुर्ण हिंदुस्तान मध्ये गरजुना ९१ हजार अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहेत,कोरोणा काळात ३० मुख्य शहरी भागात मोफत जेवण ठेवण्यात आले होते, कर्नाटक,व मध्ये प्रदेश या दोन सिमेवर मोफत जेवण ठेवण्यात आले होते,
पावनखिंड,हर हर महादेव,बलोच, छावा,वेदात विर दैवडले साथ, मानापमान, आशा अनेक चित्रपटांमध्ये मावळ्यांची भूमीका साकारली आहे, आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त वेळ पुर्ण हिंदुस्तान मध्ये रक्तादन शिबीर राबविण्यात आले आहेत , १८ हजार वृक्षारोपण करण्यात आली आहेत २०२८ गरजूंना रक्त देण्यात आली आहे सातारा ,सांगली, कोल्हापूर, महाड, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पुर ग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व इतर वस्तू वाटप करण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक करण्यासाठी विविध भागात सहकार्य करण्यात आले आहे आतपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 46 पुरस्कार मिळाला आहेत