परंडा-पुरात अडकलेल्या माणसांना हेलिकॉप्टर द्वारे एयरलिफ्ट करून सुखरूप ठिकाणी पोचवले.

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरजन्य स्थिती असून भूम तालुक्यातील अनेक भागात पुराच्या पाण्यात नागरिक अडकले आहेत. परंडा येथील साकत , लाखी या भागात पुरात अडकलेल्या माणसांना हेलिकॉप्टर द्वारे एयरलिफ्ट करून सुखरूप ठिकाणी पोचवले असून अडकलेल्या नागरिकांची सुटका केली आहे. पूरस्थिती पाहून आमदार तानाजी सावंत हे पुण्यावरून परंडा येथे येत असून ते या भागात भेटी देऊन नागरिकांना दिलासा व मदत देणार आहेत. सावंत यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पूरग्रस्त भागात जाऊन मदत करण्याचे आदेश दिले असून यंत्रणा कामाला लागली आहे. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता त्यांनी जे लागेल ते स्वखर्चाने करा असे सांगितले आहे. आमदार सावंत यांनी नागरिकांना मदतीच्या सूचना प्रशासनाला जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. एनडीआरएफ टीमला देखील संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजनाबाबत विनंती केली आहे नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर व्यवस्था केली आहे काही जणांना बाहेर सुद्धा काढले आहे लाखी, येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर बोट याद्वारे बचाव कार्य केलं आता रुई ढगपिंपरी वडनेर, देवगाव, वाघेगव्हाण येथे बचाव कार्य करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ संपर्क ९९७०९४६८१०/ ९१०४२५२५२५ करावा प्रशासन आपल्या सेवेसाठी सुद्धा आहे. आपल्या सुरक्षितेची काळजी घ्या अशी अहवाल सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!