स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून ; राष्ट्रवादी उमेदवारांचा सोनारीमध्ये प्रचाराचा शुभारंभ


परंडा दि १ (प्रतिनिधी) परंडा तालुक्यात निवडणूक रणधुमाळी जोरदार चालू आहे त्या अनुषगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारच्या प्रचारचा नारळ राष्ट्रवादीचे मा. आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते सोनारी येथील कुलदैवत असलेल्या काळभैरवनाथ मंदिरात फोडुन शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही अजित दादांच्या निधनांचे पडसाद निश्चित उमटणार आहेत असे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी सोनारी येथे राष्ट्रवादीच्या डोंजा गटातील उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना सांगितले . मोटे म्हणाले डोंजा गटातील जिल्हा परिषदेचे कार्यक्षम उमेदवार, भाऊसाहेब खरसाडे, पंचायत समितीचे उमेदवार सोनारी गट मंदाकिनी मिस्कीन डोंजा गट पंकज पाटील यांचा प्रचार शुभारंभ कसलाही गाजावाजा न करता सुरू करण्यात आला .

प्रचार सुरू करण्याआधी स्वर्गीय राष्ट्रवादी पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब पाटील सोनारीकर, राहुल बनसोडे, भागचंद तात्या नेटके, मलिक सय्यद, बाबुराव काळे, रावसाहेब खरसडे, बप्पा साबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

error: Content is protected !!