परंडा : जमिनीच्या वादातून तरुणास काठीने बेदम मारहाण; ४ आरोपीवर गुन्हा दाखल.

परंडा (माझं गाव माझं शहर) तालुक्यातील बावची येथील घटना जमिनीच्या जुन्या वादातून एका 35 वर्षे तरुणाला शिवीगाळ करत पीव्हीसी पाईप आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना बावची शिवारात घडली. याप्रकरणी बुधवारी १८ मार्च रोजी परांडा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  किरण मारुती खवले वय ३५ राहणार बोडका तालुका परांडा जिल्हा धाराशिव असे या मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार १८ सकाळी साडेदहाजाच्या सुमारास किरण कवले हे बावची शिवार येथे शेतात होते त्यावेळी त्यांच्या आरोपीसोबत जमिनीच्या कारणावरून वाद उपळून आला या वादातून संतापलेल्या आरोपीने किरण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांना लाथा बुक्यांनी व पीव्हीसी पाईप, काठीने बेदम मारून करून जखमी केले त्यावेळी पुढे जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर किरण खवले यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून फिर्यादरांना पोलीस ठाण्यात सौरभ शंकर गायकवाड संकेत नाना खराडे रोहित तानाजी गायकवाड आणि जालिंदर गायकवाड या सर्व राहणार बावची चार जनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम १३६(२),११८(१),(२), ११८(१), ११५(२) ३५२,३५१ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील प्रकरणाचा तपास परंडा पोलीस करत आहे.

error: Content is protected !!