परंडा(माझं गांव माझं शहर) सालाबादाप्रमाणे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार ता.२० रोजी येथील विठ्ठल मंदीर, कुराड गल्ली येथे नाभिक समाजाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.
संत सेना पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. परंडा भजनी मंडळाचा भजनाचा,गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन नाभिक संघटनेचे युवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष नागेश काशीद,शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी १२ वाजता संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पवृष्टी करण्यात आली.संत सेना महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली.यावेळी नाभिक संघटनेचे नागेश यादव,व्हाईस आॕफ मिडिया जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद,नागेश डाके,विशाल काशीद,दत्ता डाके,नरेश डाके,सावता परिषद प्रदेश संघटक शिवाजी येवारे,परिट संघटनेचे बापु मुळे, प्रितम डाके,संजय डाके,उमेश थोरात,संतोष भालेकर,अंकुश जमदाडे,गणेश जमदाडे,रमेश गायके,बाॕबी काशीद,अॕड अनिकेत काशीद,सुरज काळे,धीरज काळे,नागेश राऊत,संतोष डाके,वसंत दळवी,गौरव वाघमारे,ओंकार काशीद,रोहन यादव,दिपक डाके,सचिन डाके,सचिन भालेकर,नितीन डाके,राहुल डाके,विवेक डाके,अभिषेक काशीद, ओंकार डाके,कृष्णा काशीद आदिसह महिला,नाभिक समाजबांधव,नागरीकांची उपस्थिती होती.