परंडा (तानाजी घोडके) येथील महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून, वीज बिलांमध्ये मीटर रीडिंग उपलब्ध नसतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे, सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आणि पवित्र रमजान महिनाही सुरू आहे, अशा काळात वीजपुरवठा खंडित करून महावितरण कडून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
अनेक ग्राहकांच्या वीज बिलावर मीटर रीडिंगचे फोटो किंवा अचूक आकडेवारी उपलब्ध नाही. असे असतानाही अव्वाच्या सव्वा बिल देऊन महावितरणचे कर्मचारी थकीत वसुलीसाठी ग्राहकांच्या घरी तगादा लावत आहेत. बिलातील त्रुटींकडे तक्रार करूनही अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. नियमानुसार, अचूक रीडिंग नसेल तर बिल दुरुस्त करून देणे अपेक्षित असताना, थेट वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. नियमांनुसार मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिले देणे चुकीचे आहे, तरीही येथे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.
विद्यार्थी आणि रोजेदार( उपवास ) संकटात:
सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. रात्रीच्या वेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वीज नसल्यामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे. दुसरीकडे, रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवांना सहरी आणि इफ्तारच्या वेळी विजेची अत्यंत गरज असते. अशा संवेदनशील काळातही कोणताही मानवतावादी दृष्टिकोन न ठेवता महावितरणकडून वीज खंडित केली जाते
वायरमन सांगतात आमच्या पगारी मधून पैसे कट केले.मे साहेबांनी कोणकोणाचे पैसे कट केली आणि कोणत्या ग्राहकांची बिलं कर्मचारी पगारी मधून भरली सद्या नागरिकामध्ये संताप व्यक्त होत आहे.
महावितरणच्या या मनमानी कारभाराविरुद्ध परंडा तालुक्यातील ग्राहक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत वीज बिलातील त्रुटी दूर होत नाहीत आणि अचूक रीडिंग मिळत नाही, तोपर्यंत सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी वीजाग्राह का कडून केली जात आहे .