परंडा: गॅस कटरच्या सहाय्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडली ! पण तिजोरी फोडता आली नाही.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परंडा या बँकेच्या पाठीमागून लोखंडी खिडकी चे गज गॅस कटरच्या साहाय्याने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केलेल्या.असल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे या बाबतची माहिती अशी शहराच्या मध्यवर्ती व मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँके पाठीमागून खिडकी ची गज कापुन बँकेत प्रवेश मिळविला पण मुख्य तिजोरीचे लॉक न निघाल्याने रिकाम्या हाताने चोरट्यांना परत जाण्याची वेळ चोरट्यांवर आली
बँकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यावर कापडा झाकला होता त्यामुळे चोरटे दिसु शकले नाहीत शहरात चोरी च्या प्रमाणात वाढ होत आहे तेव्हा पोलीसांनी रात्री ची गस्त वाढविणे आवश्यक आहे


शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला तिजोरीत पंचवीस लाख रुपये असल्याचे समजले आहे या घटनेमुळे परंडा शहरातील व्यापारी नागरिक यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशा वारंवार घटणाऱ्या घटनांना पोलीस प्रशासनाने वेळीच आळा घालावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!