परंडा-येथील सराफ व सुवर्णकार यांच्या वर पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या अमानुष व चुकीची कार्यवाही होत आहे तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याने सराफ व्यापारी यांचा १० ऑगस्ट पासून बेमुदत बंद पुकारला असुन याबाबत जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी (१४ मार्च २०२४) काढलेल्या परिपत्रकाचे व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या परिपत्रकाची कोणतीही अंमलबजावणी महाराष्ट्र राज्याचे कोणतेही पोलीस अधिकारी सूचनांचे पालन करीत नाहीत व प्रतिष्ठित सराफ सुवर्णकार यांना याबाबत होणारा अमानुष त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच एका चोराने नाव घेतले तर त्याची शहानिशा योग्य पद्धतीने न करता आम्हाला आरोपी ठरवणे योग्य व उचित नाही सराफ सवर्णकार यांना कोणतेही तपास कामात हजर व्हा ४१ ए अशी नोटीस देणे अनिवार्य आहे असा आदेश सुप्रीम कोर्टाने केलेला असून सदर आदेशाचे कुठेही पालन होताना दिसत नाही.नोटीस न देता सराफा बाजारात पोलीस गाडी घेऊन येऊन चुकीची कार्यवाही केली जाते.मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र शासन मार्फत दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही आजपर्यंत सराफ सुवर्णकार असोसीएशन यांना विश्वासात न घेता कोणतीही दक्षता समिती स्थापन झाली नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री यांच्या आदेशाला पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन केराची टोपली दाखवली आहे.मुख्यमंत्री तसेच पोलीस व महसूल प्रशासन याचे लक्ष वेधण्यासाठी परांडा सराफ सुवर्णकार असोसिएशन तर्फे बेमुदत बंद १० ऑगस्ट २०२५ पासून पुकारला आहे.आमचे प्रश्नाकडे गांभीर्याने पाहाल अशी आशा व्यक्त करतो, अन्यथा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनापासून अमर उपोषण करावे लागेल.
निवेदनावर सराफ व सुवर्णकार संघटनेचे राज्य सह सचिव प्रशांत बागडे, ता.अध्यक्ष सागर लंगोटे, उपाध्यक्ष शिवम पेडगावकर, ओंकार शहाणे, मनोज चिंतामणी, अभिजित पेडगावकर, विनोद चिंतामणी, नितीन महामुनी,आदी सह सराफ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.