परंडा(प्रतिनिधी) परंडा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची आचार सहिता लागू असताना परंडा येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर समक्ष परंडा येथील न.पा. सभागृह मध्ये छाननीच्या वेळी आक्षेपाच्या वेळी हजर असलेल्या २४ नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्यावर निवडणूक आधिकारी व संबंधितावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी माहितीअधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी धाराशिव, उप विभागीय अधिकारी भूम यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे .
काय आहे निवेदन :
नगरपरिषद परंडा मध्ये दि 18/11/2025 रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाच्या छाननी वेळी निवडणूक अधिकारी यांनी ज्या उमेदवारांवर आक्षेप घेतले , समोरचे संबंधीत यांना दोघांना ना बोलविता अंदाजे शेकडो नागरीक उपस्थित होते. त्यावेळी आक्षेपावर निकाल देताना निवडणूक अधिकारी यांनी सबंधीत मोजके उमेदवारांसमोर निकाल न देने अपेक्षित होते .तसे न करता सर्व नागरीकाच्या समोर निकाल दिले . असल्याने दोन्ही गटात बाचाबाची झाली, हाणामारी झाली आणि त्याला कारणीभूत निवडणूक अधिकारी (तहसीलदार व संभंदीत अधिकारी) हे असून त्याच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी.
परंडा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची छाननी करीत असताना आक्षेप घेतलेल्या प्रकरणांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आक्षेप फेटाळून लावल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून समर्थन केले. त्याचा विरोधकांना राग आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोन गटांत बाचाबाचीचे रुपांतर हाणामारी झाले होते. आचारसंहिता लागू असताना हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ , तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी सभागृहाबाहेर हाकलून दिले. बाहेर गेल्यानंतर शिंदे सेना व ठाकरे सेना गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने भिडले होते. दगडफेक केली होती. दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार नगरपरिषदेचे नगर अभियंता राहुल रणदिवे यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिल्याने याप्रकरणी दोन्ही गटांतील २४ जणांवर गुन्हा दाखल झालेले असून ते झालेले गुन्हे माघार घेण्यात यावे. तसेच या प्रकाराला कारणीभूत असलेल्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद परंडा, हे जबाबदार असून त्यांच्यावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. कारवाई न झाल्यास संघटने मार्फत आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला आहे .
या निवेदनावर शेख फारूक. जमिर शिकलकर. शिवाजि करळे . मुस्तकीम शेख. कानिफनाथ सरपने.फारूक मूलानि. रावसाहेब खरसडे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.