परंडा- रा.गे. शिंदे महाविद्यालयाचा पूरग्रस्त गावाला मदतीचा हात.

परंडा दि.२५ (प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परांडा या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त गाव वाघेगव्हाण या गावास भेट देऊन ज्या लोकांचे मुसळधार पावसाच्या पाण्याने नुकसान झालेले आहे संसार उघड्यावर पडले आहेत अशा लोकांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले .संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्यामुळे घरांमध्ये पाणी जाऊन अत्यावश्यक वस्तू खाद्यपदार्थ तसेच महत्त्वाच्या काही घरगुती वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत . तेव्हा त्यांना मदतीची गरज करणे आवश्यक होते . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या गावातील लोकांना सदर मदतीचा हात देऊन महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .दैनंदिन जीवनाणात लागणारे अत्यावश्यक वस्तूचे किट या गावातील लोकांना देण्यात आले .याप्रसंगी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख मराठी व प्रमुख डॉ गजेंद्र रंदील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा जगन्नाथ माळी डॉ दीपक तोडकरी तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संभाजी गाते वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा डॉ सचिन चव्हाण बी व्होक विभागाचे समन्वयक डॉ संतोष काळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी हनुमंत कुटे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित होते . यावेळी या गावातील पूरग्रस्त लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . भावनांश होऊन ते झालेल्या घटनेची व्यथा मांडत होते .
त्यांची दयणीय अवस्था पाहून त्यांना महाविद्यलयाने मदतीचा हात दिला त्यामुळे त्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले आणि महाविद्यालयाचे कौतुकही केले .

error: Content is protected !!