परंडा:- येथे १ ऑगस्ट २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर आयोजन- अध्यक्ष तानाजी घोडके

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या हेतूने सतत पाठपुरावा करत दिव्यांग शिबिर तपासणीचे दर महिन्याला आयोजन करतात त्या दृष्टिकोनातून दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन केले आहे. तरी परंडा तालुक्यातील जे दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित आहेत किंवा ज्या दिव्यांगाच्या पगारी बंद आहेत अशा दिव्यांग बांधवांनी १ ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी आपले प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन पावती घेऊन उपस्थित राहावे असे आव्हान दिव्यांग उद्योगसमूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिव्यांग बांधवांना व दिव्यांग बांधवांचा सांभाळ करणाऱ्या सहकारी नागरिकांना  केले आहे. तरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आधार कार्ड ऑनलाइन पावती फोटो व स्वतः दिव्यांग व्यक्ती यांनी समक्ष हजर राहावे.

ठिकाण: उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय (सरकारी दवाखाना ) परंडा जिल्हा धाराशिव

Leave a Reply

error: Content is protected !!