परंडा (तानाजी घोडके ) शहरातील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्या प्रशासकीय काळात केलेल्या भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करून निलंबित करण्यात यावे. अशी मागणी परंडा शहर भष्टाचार नियोजन समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार परंडा याच्या मार्फत देण्यात आले. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दि. १० जुलै रोजी परंडा शहर बंद चे आवाहन करण्यात आले होते या बंदला व्यवसाईकांनी, व्यापारी उत्फुर्त पणे प्रतिसाद दिला.
दिलेल्या निवेदनात म्हटले की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक डबे कचरा संकलन करण्यासाठी शहरवासीयांना दिले नाहीत केवळ कागदपत्रे डबे दिल्याचे दाखविण्यात आले. घन कचरा ची निविदा १५लाख रुपये ची असताना कामावर १० मजुर सुध्दा येत नाहीत. परंडा शहरातील सर्व रस्त्याची अवस्था खराब झाली आहे पाऊस पडला तर रस्त्यावरून चालता येत नाही. शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. उत्सवाच्या काळात खड्डे बुजविण्याचे काम केले जाते नंतर त्या टाकलेल्या मुरुमाची माती होऊन सर्व रस्ते चिखलमय होतात, शहरात पाणी पुरवठा ही अपुरा करण्यात येत आहे शहराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठा सिना कोळेगाव प्रकल्पात पाणी साठा उपलब्ध असताना पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. चार दिवसांतुन फक्त अर्धा तास पाणी पुरवठा केला जातो. तर शहराच्या काही भागात पाणी पुरवठा होत नाही नागरिकांतुन तक्रार करुन देखील दुर्लक्ष करण्यात येते. शहरातील मुंगशी रोडवर लाखो रुपये खर्च बांधण्यात आलेले शौचालय गायबच झाले , पण त्याची नोंद कागदपत्रे काम पूर्ण झाले अशी आहे. नगरपालिका मधील कर्मचारी यांचा २०२० मध्ये ११ महिन्याचा कागदोपत्री उचलून घेण्यात आला पण आजतागायत कर्मचारी यांना देण्यात आलेला नाही.
कुर्डुवाडी रोडवरील स्मशान भुमीचे सुशोभिकरण करण्याचे काम समाज सेवक जगन्नाथ सांळुके यांनी स्वखर्चाने केले असताना देखील नगरपालिके कडून काहीही काम न करता ते काम नगरपालिके कडून करण्यात आले आहे असे खोटे दाखवून काम न केलेल्या कामाचे बील उचलून शासकीय रक्कमेचा अपहार केला. शहर विकासाचा निधी गावाबाहेर वापरून सुशोभिकरण केले आहे. असे निवेदनात म्हटले आहे शहरातील नागरिकांना विनाकारण बेकायदेशीर अतिक्रमण असलेल्याचे सांगुन नोटीसा देत आहेत. ज्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे ते तसेच आहे ते पण काढण्यात यावे अशी मागणी केली तर काढण्यासाठी दुर्लक्ष केले जाते शहरातील विकास कामासाठी आलेला शासकीय निधीचा वापर शहरात न करता तो शहराच्या बाहेर वापरण्यात आला आहे प्रत्येक विकास कामात मुख्याधिकारी याचा अप्रत्यक्ष कमिशन मध्ये सहभाग आहे. शहरातील रस्ता व गटारी च्या कामात ही मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाला आहे.
मुख्याधिकारी या प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात शासकिय रक्कमेचा गैरवापर केला आहे. त्याच्या कुंटुबियाच्या नांवे विविध ठिकाणी घेतलेल्या स्थावर जंगम मालमत्तेचे चौकशी ई.डी मार्फत करण्यात यावी , मुख्याधिकारी यांनी प्रशासकीय काळातील केलेल्या कारभाराची उच्च स्तरीय चौकशी करून मुख्याधिकारी यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
परंडा बंद च्या काळात पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या निवेदनाच्या प्रती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर ,जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील. सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे , ॲड नुरोद्दीन चौधरी, अजय खरसडे ,जमीलखा पठाण ,शब्बीर भाई पठाण, इस्माईल कुरेशी ,संदीप पाटील, श्रीहरी नाईकवाडी ,नंदु शिदे, सत्तार पठाण ,कुणाल जाधव, मन्नान बासले , बाशाभाई शहबर्फीवाले याच्या सह ६४ जणांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.