परंडा महावितरणचा ‘शॉक’दायक कारभार; वीज बिलावर रीडिंग नाही, तरीही वसुलीचा तगादा! शहर अभियंता लक्ष देतील का?

परंडा (तानाजी घोडके) येथील महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून, वीज बिलांमध्ये मीटर रीडिंग उपलब्ध नसतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे, सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आणि पवित्र रमजान महिनाही सुरू आहे, अशा काळात वीजपुरवठा खंडित करून महावितरण कडून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला…

अधिक बातमी वाचा...

‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’मुळे दिव्यांग सक्षमीकरणाला डिजिटल गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक मुंबई, दि. २२ : दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल अॅप विकसित केले आहे.दिव्यांग सहाय्यक पोर्टल’मुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्री…

अधिक बातमी वाचा...

परंडा🚰 पंचायत समिती आवारात शौचालयाचा पत्ता नाही; हगणदारी मुक्त भारताच्या घोषणा फक्त कागदावरच?

परंडा(तानाजी घोडके) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत संपूर्ण देश ‘हगणदारी मुक्त’ (ODF) झाल्याचे दावे सरकारकडून वारंवार केले जात आहेत. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयाची स्थिती पाहता हे दावे केवळ कागदावरच आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.तालुक्याचे महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या पंचायत समितीच्या आवारातच सार्वजनिक शौचालय उपलब्ध…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे ६ वर्षीय चिमुरड्या  जुळ्या बहिणींनी रमझानचा पहिला रोजा केला .

(माझं गांव माझं शहर) परंडा येथील तोषीब खालिक शेख यांचे जूळ्या दोन्ही मुलीने पहिला रोजा / उपवास केला .रमझानचा पवित्र महिना आत्मशुद्धी आणि संयमाचा संदेश देतो याच पवित्र भावनेतून आतिफा/ आफिया या दोन गोड जावळ्या बहिणींनी ६ वर्ष .वयाने लहान असूनही मोठ्या उत्साहात रमझानचा उपवास (रोझा) धरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.लहान वयात मोठी जिद्द:…

अधिक बातमी वाचा...

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ♿ दिव्यांग योजना तात्काळ आधार लिंक करा; अन्यथा अनुदान बंद !

महाराष्ट्र(मुबंई) राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनांनुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक ओळखपत्र (UDID Card), आधार कार्ड तसेच बँक खात्याची छायांकित प्रत तात्काळ संगणकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावी. या…

अधिक बातमी वाचा...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त; धाराशिव जिल्हा प्रेस क्लब शाखा कळंब अंतर्गत कळंब शहरामध्ये उपक्रम

कळंब : रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त कळंब शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न धाराशिव प्रेस क्लब शाखा कळंब यांच्या वतीने, अन्नदान, पाणी बॉटल,व रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते.५०० लोकांचे अन्नदान, १४०० पाणी बॉटल, व रक्तदान शिबिर राबवण्यात आले होते. त्यामध्ये १७ रक्तदात्याने रक्त दान करून कळंब…

अधिक बातमी वाचा...

परंडा📌 उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; कामाच्या व्यापामुळे अधिकारी तणावाखाली रिक्त पदे भरण्याची मागणी

परंडा (तानाजी घोडके) येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. एकाच व्यक्तीला अनेक टेबलांचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याने अधिकाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या कामांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी परंडा…

अधिक बातमी वाचा...

परंडा📍 दिवस चौथा: लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन चालू ; प्रशासकीय कामकाज ठप्प !

परंडा (तानाजी घोडके): महाराष्ट्र राज्य सरकारी लिपिक संवर्गीय हक्क समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, परंडा येथील विविध शासकीय कार्यालयांतील लिपिक कर्मचारी यांनी  ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. ग्रेड पे मध्ये सुधारणा करणे आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि इतर विभागांतील कामकाज…

अधिक बातमी वाचा...

परंडा👉 पंचायत समिती आवारात अतिक्रमणांचा विळखा; गटविकास अधिकारी विनोद जाधव गप्प का?

परंडा(तानाजी घोडके) तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा कणा समजला जाणाऱ्या परंडा पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात सध्या अतिक्रमणांचा अक्षरशः ‘धडाका’ सुरू असल्याचे चित्र आहे. कार्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामे आणि छोट्या टपऱ्यांनी पाय पसरले असून, यामुळे शासकीय कामात अडथळे येत आहेत. मात्र, या गंभीर प्रकाराकडे गटविकास अधिकारी (बि डी ओ) विनोद जाधव हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

अधिक बातमी वाचा...

भाजपा कार्यालय परंडा🚩 येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

परंडा :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, परंडा न.प. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, ता. उपाध्यक्ष किरण देशमुख, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उद्योजक अशोकबापु…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री. प्रभाकर मिरगणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर यांच्यासह श्री. सचिन मोरे सर, श्री….

अधिक बातमी वाचा...

धाराशिवच्या सत्तेचा तिढा मुंबई दरबारी; उपमुख्यमंत्री शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यात खलबतं

मुंबई (तानाजी घोडके) धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यात मुंबईत प्रदीर्घ चर्चा झाली.बातमीचे ठळक मुद्दे:जिल्हा परिषदेत महायुतीची मोर्चेबांधणी: धाराशिव जिल्हा परिषदेत भाजप (१९ जागा), शिवसेना-शिंदे गट (१५ जागा) आणि राष्ट्रवादी (६…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!