धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
धाराशिव दि १४ (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व केंद्र शासनाच्या निकषानुसार शिक्षण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी शहरातील भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि राघुचीवाडी (५ किमीच्या आत) येथील दोन संभाव्य जागांचा विचार करण्यात आला….