परंडा शहरातील जय भवानी गणेश मंडळ (आगरकर गल्ली) येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते मा.आ. श्री.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संपन्न.

माझं गांव माझं शहर:- परंडा शहरातील जय भवानी गणेश मंडळ (आगरकर गल्ली) येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्याचे लाडके , कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गात आरक्षण देत ऐतिहासिक निर्णय घेतला. महायुती सरकारचे प्रतिनिधी या नात्याने भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर…

अधिक बातमी वाचा...

समर्थ तरुण गणेश मंडळ,परंडा यांच्या वतीने पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती रॅली.

परंडा ( प्रतिनिधी) शहरातील समर्थ तरुण गणेश मंडळ सोमवार गल्ली यांच्या वतीने पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन परंडा पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक चोरमोले शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मुकुल मालक देशमुख, पोलीस पाटील संजय कदम, अब्बास…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग सेस जि. प. धाराशिव अंतर्गत अर्ज सादर करण्याचे आव्हान -दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके.

परंडा (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या स्वसंपादीत उत्पन्नातील 5 टक्के दिव्यांग सेस योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता समाजकल्याण विभागामार्फत पुढील योजना राबविण्यात येत आहेत.मतिमंद व्यक्तींना आर्थिक सहाय्य वअतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना आर्थिक सहाय्य या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील पूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी,पंचायत समिती सर्व यांच्यामार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी,समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे जल्लोष : महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य.

परंडा : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य करून जीआर काढल्याबद्दल परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुलाल उधळून व फटाके फोडून मराठा आंदोलक व समाज बांधव यांनी आनंदोत्सव , जल्लोष साजरा केला .     

अधिक बातमी वाचा...

परंडा -शहरातील एकमेव ट्रस्टी जय भवानी गणेश मंडळाची १९८२-८३ मधील श्री मुर्ती आजही कायम आहे.

परंडा, ता. २ ( तानाजी घोडके ) शहरातील एकमेव रजि. ट्रस्टी १९८० स्थापना असलेल्या जय भवानी गणेश मंडळाने ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देत समाजप्रबोधनपर उपक्रम हाती घेतले आहेत. दरवर्षी गणेश जयंतीला रक्तदान शिबिरही घेतले जाते. मिरवणुकीत लेझीम पथकासह, हलगी, टाळ पथक अशा पारंपरिक वाद्यांसह मिरवणुकीची प्रथा आजही कायम…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे १२ सप्टेंबर २०२५ रोजी दिव्यांग UDID प्रमाणपत्र तपासणी.

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या हेतूने सतत पाठपुरावा करत दिव्यांग शिबिर तपासणीचे दर महिन्याला आयोजन करतात परंतु पहिल्या शुक्रवारी ईद ए मिलाद सुट्टी असल्याने तपासणी दुसऱ्या शुक्रवारी होणार आहे. त्या दृष्टिकोनातून दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन…

अधिक बातमी वाचा...

समाज परिवर्तन महासंघाच्या नऊ वर्षाच्या लढ्याला अखेर यश

परंडा (माझं गांव माझं शहर)- समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा फुले यांची स्मारके बार्शी नगरपालिकेच्या वतीने शहरात उभा करण्यात यावीत आशी मागणी केली होती. या मागणीसाठी २०१६ रोजी बार्शी नगर परिषदेसमोर हलगी आंदोलन केले होते त्यापैकी छत्रपती शिवाजी…

अधिक बातमी वाचा...

सिरत-उन-नबी प्रश्नोत्तरे स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद; 429 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कळंब (माझं गांव माझं शहर ) ईद ए मिलादनिमित्त आझाद ग्रुपच्यावतीने आयोजित सिरत-उन-नबी प्रश्नोत्तरे परीक्षा रविवारी यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेत 429 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय होती. आझाद ग्रुपने डीजेला फाटा देऊन मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चारित्र्यची माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्याला चांगल्या पद्धतीने…

अधिक बातमी वाचा...

छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने आझाद मैदानावर साफसफाई स्वच्छता मोहीम.

परंडा(माझं गांव माझं शहर) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण मिळावा या मागणीसाठी आझाद मैदान येथे ५ दिवसापासून उपोषण चालू असताना त्या ठिकाणी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साफसफाई स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान संस्थापक अध्यक्ष शिवभक्त प्राणजीत गवंडी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विशाल…

अधिक बातमी वाचा...

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेलचे माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची विदेशात गगनभरारी!

धुळे(माझं गांव माझं शहर)कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची दक्षिण अफ्रिका जोहान्सबर्ग येथे गोल्डन हिरा गृपमधील गायत्री कंपनीज तर्फे बॅक ॲन्ड स्पेशालिस्ट साठी निवड झाली. आता विदेशात रवाना होत आहेत. सध्या ते कॉनपॅड कंपनी औरंगाबाद येथे कार्यरत होते. याआधी बॉश कंपनी राजगुरू नगर, पुणे व…

अधिक बातमी वाचा...

चोरी घटना :-आसू येथे एकाच रात्री ५ जणांची घरे फोडून ८८ हजार ५०० रुपयांची चोरी.

परंडा (प्रतिनिधी परंडा तालुक्यातील आसु येथे एकाच रात्री पांच जणांची घरे फोडून ८८ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची घटना नुकतीचघडली आहे या घटनेनंतर सर्वत्र घबराटीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेया संबंधी मिळालेली माहिती अशी की धनाजी यादव यांच्या घरांची कडी कोयडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरात ठेवलेले १०००० हजार रुपये घेऊन गेले तसेच…

अधिक बातमी वाचा...

मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांची नृसिंह गणेश मंडळास भेट..

परंडा (तानाजी घोडके) शहरातील नृसिंह नगर येथील नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन शिबिरातील रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या..याप्रसंगी नृसिंह गणेश मंडळाचे अध्यक्ष ॲड. सन्नी राशनकर, उपाध्यक्ष ऋषिकेश चव्हाण, सचिव सुयश सद्दीवाल, मनोज बप्पा बकाल, सत्यजितसिंह…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!