परंडा-पुरात अडकलेल्या माणसांना हेलिकॉप्टर द्वारे एयरलिफ्ट करून सुखरूप ठिकाणी पोचवले.

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरजन्य स्थिती असून भूम तालुक्यातील अनेक भागात पुराच्या पाण्यात नागरिक अडकले आहेत. परंडा येथील साकत , लाखी या भागात पुरात अडकलेल्या माणसांना हेलिकॉप्टर द्वारे एयरलिफ्ट करून सुखरूप ठिकाणी पोचवले असून अडकलेल्या नागरिकांची सुटका केली आहे. पूरस्थिती पाहून आमदार तानाजी सावंत हे पुण्यावरून परंडा येथे येत असून ते या भागात भेटी देऊन…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक गावात पाणी- जनजीवन विस्कळीत

परंडा( प्रतिनिधी) तालुक्यात अनेक दिवसापासून सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे सर्व धरणे तळी ओव्हरलोड झालेल्या आहेत या मध्ये हिंगणगाव बुद्रुक या गावांमध्ये पाणी शिरले असून गावातील नागरिकाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाच्या वतीने त्वरित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणून सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत.बावची व खासापुरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचले आहे.

परंडा(तानाजी घोडके) शहरात पडलेल्या मोठ्या पावसाने हाहाकार उडाला आहे.ता.२१ रविवारी सायंकाळी सुरु झालेला मुसळधार पाऊस व सोमवारी राञभर धो धो मुसळधार पाऊस पडला.परंडा महसुल मंडळात ११४ मि.मीटर पावासाची यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी नोंद झाली.या पावसाने मंडई विभागातील रस्ते जलमय झाले होते.शहरातील सार्वजनिक गटारी मार्गावर मोठ्या प्रमाणात आतिक्रमण झाल्याने,गटारी तुंबल्याने जय भवानी चौकासह अनेकांच्या घरात दोन ते…

अधिक बातमी वाचा...

डॉ. अभिराज सूर्यवंशी यांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

परंडा(माझं गांव माझं शहर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील (गट अ वर्ग १ ) परीक्षेतून डॉ. अभिराज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांच्या नावाची शिफारस शासनाकडे करण्यात आलेली आहे. डॉ. सूर्यवंशी हे मुळचे परंडा तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी आहेत. डॉ. अभिराज सूर्यवंशी यांचे एमबीबीएस एमडी शिक्षण आहे….

अधिक बातमी वाचा...

पत्रकारांवरील हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडिया कडून निषेध.

मुंबई(माझं गांव माझं शहर) त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी एकामागोमाग एक दगड, लाथा-बुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून…

अधिक बातमी वाचा...

परंडा आगारात नवीन बस दाखल -जेष्ठ प्रवाशी महिलांच्या हस्ते पुजन.

परंडा ,ता.२० (प्रतिनिधी )परंडा बसआगारात दोन दिवसापुर्वी नवीन पाच बसेस दाखल झाल्या आहेत. परंडा-पुणे वल्लभनगर मार्गावर शुक्रवार ता.१९ रोजी येथील बसस्थानक फलाटावरुन नवीन बसचा शुभारंभ जेष्ठ प्रवाशी,महिलांच्या हस्ते पुजन करुन सोडण्यात आली.नवीन बसेस दाखल होत असल्याने प्रवाशातुन समाधान व्यक्त होत आहे.येथील बस आगारातुन तालुका परीसरात व लांब पल्ल्यासाठी खिळखिळ्या बसेस धावत आहेत.परंडा आगाराचे उत्पन्न चांगले…

अधिक बातमी वाचा...

‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी’ कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा पनवेलमध्ये भव्य सोहळा.

नवी मुंबई (प्रतिनिधी) सामान्यतेच्या चाकोरी मोडून अपार जिद्दीने स्वतःचा प्रवास घडवणाऱ्या महिलांचा गौरव करणे हे केवळ स्त्रीशक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘मनमुक्त फाऊंडेशन’ तर्फे येत्या शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता सुरुची हॉल, पनवेल येथे ‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी, कृतज्ञता सोहळा’ हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला जात आहे.महाराष्ट्रातील…

अधिक बातमी वाचा...

महात्मा गांधी विद्यालयाचा कबड्डीचा संघ तालुक्यातून प्रथम व जिल्हास्तरासाठी निवड.

परंडा(तानाजी घोडके) तालुक्यातील न्यू हायस्कूल अनाळा येथे घेण्यात आलेली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अटीतटीची होऊन महात्मा गांधी विद्यालयाची टीम १३ गुणांनी विजयी झाली असून हा संघ तालुक्यातून प्रथम क्रमांकाने विजयी होऊन जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे त्याबद्दल सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक पुरुषोत्तम डोंबाळे, उत्रेश्वर सूर्यवंशी, शशिकांत नलावडे यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे व पर्यवेक्षक बाळासाहेब…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ घोषित करा, शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीपूर्वी मदत द्या

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ऑगस्ट – सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक गंभीर आर्थिक संकटात आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आमदार राणादादा पाटिल यांनी…

अधिक बातमी वाचा...

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा निमित्त जनता दरबार..

परंडा(माझं गांव माझं शहर) राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा परंडा वतीने जनता दरबारचे आयोजन वाकडी, ता. परंडा येथे करण्यात आले होते.भारतीय जनता पार्टी च्या वतीने जनता दरबार @३ नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटात वाकडी येथे श्री राम मंदिर परिसरात…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

परंडा दि.१७(माझं गांव माझं शहर) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कै रा गे शिंदे गुरुजी यांचे सुपुत्र तुळजापूर…

अधिक बातमी वाचा...

सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा मराठवाडा रत्न पुरस्कार प्रदान .

परंडा दि १७(माझं गांव माझं शहर) : – परंडा – पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा ” मराठवाडा रत्न ” पुरस्कार प्रदान करण्यात आला . मराठवाडा सेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मराठवाडा मुक्ती दिन दि १७ सप्टेबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!