राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात वाढ .
धाराशिव (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या सामाजिक सशक्तीकरणासाठी ठोस पाऊल उचलत एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात आता ₹१,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिव्यांगांना दरमहा ₹१,५०० इतके अनुदान मिळत होते. आता हे वाढवून ₹२,५०० प्रतिमाह करण्यात आले आहे….