अस्थिव्यंग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन.

सोलापूर(प्रतिनिधी) दि.२ - केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), मुंबई, मार्फत एस. आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, जिल्हा समाज कल्याण विभाग, सोलापूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सोलापूर यांच्या सहकार्याने एडिप योजनांतर्गत सोलापूर जिल्हयातील तालुका निहाय अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिफर्स यांचे मोजमाप व तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप शिबीराचे आयोजन दिनांक ८ जुलै २०२५ व ते दिनांक १७ जुलै २०२५ या कालावधीपर्यंत सकाळी १० ते ५ या दरम्यान सोलापूर जिल्हयातील खालील तालुका निहाय ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर शहर, ता. दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर दिनांक व वेळ - ८ व ९ जुलै व सकाळी १० ते ५ शिबीराचे ठिकाण जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कर्णिक नगर, सोलापूर

संपर्क- शशीभूषण यलगुलवार व रामचंद्र कुलकर्णी, अक्कलकोट दिनांक व वेळ -१० जुलै सकाळी १० ते ५ शिबीराचे ठिकाण मूकबधिर निवासी शाळा घौडगांव रोड, अक्कलकोट संपर्क मधुकर कोरे, बाशीं दिनांक ११ जुलै सकाळी १० ते ५ शिबीराचे ठिकाण बधिर मूक विदयालय, बार्शी संपर्क- दत्तात्रय मुळे सर, पंढरपूर दिनांक १२ जुलै सकाळी १० ते ५ शिबीराचे ठिकाण नवजीवन अस्थिव्यंग निवासी शाळा, के बी पी. कॉलेज चौक, पंढरपूर संपर्क प्रदीप कवडे व मोहन थोरात मोहोळ दिनांक १३ जुलै सकाळी १० ते ५
शिबीराचे ठिकाण प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जुनेद मूकबधिर निवासी विदयालय, मोहोळ संपर्क-राजकुमार पाटील …अण्णाराव शिंदे करमाळा दिनांक १४जुलै सकाळी १० ते ५ शिबीराचे ठिकाण जगदंबा मूकबधिर विदयालय संपर्क -दत्तात्रय काळे, सांगोला दिनांक व वेळ १५ जुलै सकाळी १० ते ५ शिबीराचे ठिकाण पंचायत समिती सांगोला. संपर्क नितीन म्हेत्रे. मंगळवेढा दिनांक व वेळ -१६ जुलै शिबीराचे ठिकाण -मूकबधिर निवासी शाळा, मंगळवेढा संपर्क चिद्रसेन पाथरुठ, कुर्डूवाडी (माढा) दिनांक १७ जुलै सकाळी १० ते ५ शिबीराचे ठिकाण मूकबधिर निवासी विदयालय कुडूवाडी, संपर्क शफी शेख तरी सर्व अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगानी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सोलापूर प्रकल्प संचालक प्रकाश यलगुलवार, प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सोलापूर यांनी केले आहे.

error: Content is protected !!