मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त परंडा येथे १८७ जणांचे रक्तदान..

Whatsapp image 2025 07 22 at 17.45.33 da13ee35

परंडा (२२ जुलै) महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष, कामदार, कणखर, उर्जावान, लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. परंडा येथील शासकीय विश्रामगृहा समोरील खुल्या मैदानात रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परंडा तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन १८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असून, अनेक रुग्ण रक्ताच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी यांनी “सन्मान नको, रक्तदान हेच खरे दान” असे सांगत एक सामाजिक संदेश दिला. याच प्रेरणेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परंडा ग्रामीण मंडळ व शहर मंडळ आणि मल्लिकार्जुन ब्लड सेंटर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Whatsapp image 2025 07 22 at 17.45.34 ac833f29

या शिबिरात अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी सामाजिक भान जपत मा. देवेंद्रजी फडणवीससाहेब यांच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करून समाजप्रती आपली बांधिलकीची जपली. या पवित्र कार्यात मनापासून सहभाग नोंदवणाऱ्या रक्तदात्यांचे भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी मन:पूर्वक आभार मानले..!
यावेळी भाजपा मंडळाध्यक्ष ग्रामीण अरविंदबप्पा रगडे, शहर मंडळाध्यक्ष उमाकांत गोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.‌ जहीर चौधरी, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, माजी तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, सतिश देवकर, विठ्ठल तिपाले, शिवाजीराव पाटील, तुकाराम हजारे, शहाजीआप्पा पाटील, अजित काकडे, रामदास गुडे, परसराम कोळी, अर्जुन कोलते, विलास खोसरे, दत्ता ठाकरे, डॉ.अमोल गोफणे, जयंत सायकर, किरण कवटे, मुकुंद चोबे, तुषार नेटके, योगेश डांगे, नागेश शिंदे, राहुल फले, मिलिंद शिंदे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, आदर्श ठाकूर, सुरज काळे, गजानन तिवारी, व्यंकटेश दिक्षित, लखन ठाकूर, अमर ठाकूर, कार्तीक दिक्षित, अजिम हन्नुरे, जयंत भातलवंडे, शिवम भातलवंडे, आप्पा मदने, तुषार कोळेकर, शुभम ठाकूर, हिमालय वाघमारे, अतुल औसरे, किरण पांडे महिला मोर्चा तालुकाध्यक्षा नुतनताई खोसरे, शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, शुभदा शेलार तसेच मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूर चे सत्यम गायकवाड, सुशांत गिराम, विशाल कोल्हुर, तन्वीर शेख, सायली खुळे, भुमिका रोकडे तालुक्यातील व शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!