गौंडरे येथे आषाढी वारीच्या निमित्ताने गावातील धर्मवीर संभाजी विद्यालय व जि . प .शाळा यांनी भक्तीरसाबरोबर निसर्ग रसाचा आनंद घेतला .

करमाळा(प्रतिनिधी ) करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे आषाढी वारीच्या निमित्ताने गावातील धर्मवीर संभाजी विद्यालय व जि . प .शाळा यांनी भक्तीरसाबरोबर निसर्ग रसाचा आनंद संपूर्ण गावकऱ्यांना वाटला . शाळेतील विद्यार्थी बनले वारकरी . टाळ मृदंग विना आणि मुखाने राम कृष्ण हरी म्हणा असा गजर काढत सर्व विद्यार्थी व शिक्षक वारकरी गणवेशात पावली खेळत दिंडी काढली . विद्यार्थ्यांना विठ्ठल रुक्मिणी बनवून ग्रामस्थांना दर्शन दिले . इयत्ता आठवीचा विद्यार्थी सुरज कास्वीद याने कीर्तनाद्वारे आई-वडील हेच विठ्ठल रुक्मिणी आहेत. व वसुंधरा परिवाराच्या विचाराने निसर्गमय गाव हीच खरी पंढरी आहे .सावली पाहिजे असेल , तर झाड लावा माऊली, असे अनेक काळाची गरज असणारे संदेश दिले .

या सोहळ्यातच जि .प .प्राथमिक शाळा गौंडरे यांनीही महावृक्ष दिंडी सोहळा काढून पालखीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाबरोबर भारताचे संविधान आणि भारतीय वृक्षांची भव्य मिरवणूक काढून समाजाला पर्यावरण आणि समता बंधूता सहिष्णूता असे विचार दिले . समाजसेवा व पर्यावरणावर अनमोल काम करणारा गौंडरे गावातला संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं झाड पोहचल आहे . त्या वसुंधरा परिवाराने 2000 भारतीय वृक्ष व भारतीय वृक्षांच्या बियांचा वाटप संकल्पना राबवली या कार्यक्रमाला धर्मवीर संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक संस्थापक अध्यक्ष बापू नीळ, संस्थेचे सचिव आणि पर्यावरअभ्यासक हरिदास काळे , सोहळ्यासाठी ज्यांनी खूप परिश्रम घेतले असे सुखदेव गिलबिले ,पुराणिक संतोष ,त्याच बरोबर सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते . जि .प . प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माने मॅडम ,गाडे मॅडम, घाडगे सर , हनपुडे उत्तम उपस्थित होते . विद्यार्थांच्या जेवणाचे नियोजक तानाजी नीळ गुरुजी , शा व्य समीती मा अध्यक्ष नानासाहेब कांबळे ग्रा. सदस्य ज्ञानेशर बिचीतकर ,अंगद फरतडे, बिभीषण अंबारे ,संभाजी कांबळे, कापले, हनपुडे, अंबारे, गायकवाड, साळवे , मांढरे अशा अनेक घरातील पालक वर्ग उपस्थित होते . भव्य दिव्य वृक्ष वारी व दिंडी सोहळा काढल्या बदल शिक्षक विद्यार्थी व वसुंधरा परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

error: Content is protected !!