परंडा (दि२९नोव्हेंबर)परंडा तालुक्यातील कपिलापूरी येथे तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रॉपसॅप अंतर्गत रब्बी ज्वारी या पिकाची शेतीशाळा दि२८ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली.
या वेळी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी ऊस लागवड, व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर मंडळ कृषी अधिकारी संभाजी माळी यांनी mahavistar AI App विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
उप कृषी अधिकारी अरणाळे यांनी यांत्रिकीकरणा बद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदशन केले, तर सहाय्यक कृषी अधिकारी रेश्मा कामटे मॅडम यांनी रब्बी ज्वारी पिकाबद्दल, माती परीक्षण व त्याचे फायदे या बद्दल शेतकऱ्यांना मार्गदन केले .
या वेळी राऊत सर, शिंदे सर, युवा प्रशिक्षणार्थी चैतन्य मसलकर व शिवाजी परसराम पाटील यांच्यासह कपिलापुरी येथील शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते.