परंडा दि १ : – परंडा नगरपरिषदेचे निवडणूक चांगलेच तापले असून प्रभाग ३ मध्ये झालेल्या कार्नर सभेतून दिसून आले . प्रभाग क्र ३ , ४ , २ या प्रभागासाठी कॉर्नर सभा पार पडली तेव्हां विकास कामावर संजयकुमार बनसोडे , जाकिर भाई सौदागर , दत्ता आण्णा साळूंके यांनी विरोधाकावर चांगलीच फटकेबाजी करून परंडा शहरातील विकासकामाचा आढावा घेतला . सदरील प्रभागातील उमेदवार अगदी सर्वसाधारण असुनही मात्तबर उमेदवारांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत असे चित्र आहे . या प्रभागातील उमेदवाराच्या मागे मुरब्बी व विश्लेषक सुशीलकुमार शुक्ला यांची ताकद असल्याने विरोधकांचे धाबे दणाणल आहेत असे चित्र आहे . सदरील प्रभागातील मंदिरांची कामे पंधरा दिवसात सुरूच करणार असे आश्वासन जाकिर भाई सौदागर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी दिले आहे . संजयकुमार बनसोडे यांनी यापूर्वी केलेल्या विकासावर प्रकाश पाडला . तर दत्ताआण्णा साळूंके यांनी डॉ . तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून वीज मुक्त शहर करण्याची हमी दिली . रात्रीच्या कार्नर सभेने फार मोठे परिवर्तन होईल आणि परंडा नगर पालिका एकहाती शिवसेना शिंदे गटाच्या डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली येईल आणि खरा विकास करेल अशी नागरिकांत चर्चा आहे .