अनाळा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेची इयत्ता 8वी ची विद्यार्थीनी ईश्वरी लक्ष्मीकांत पुरंदरे हिची . शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड झाल्या बद्दल दि . १० रोजी सत्कार करण्यात आला . न्यू हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार भोरे यांच्या हस्ते तिचा शाल – श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . गरिब कुटुंबातील ईश्वरी पुरंदरे हिने शिष्यवृती परिक्षेत यश मिळविल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे . तिच्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील यांनी अभिनंदन केले असून तिला शुभेच्छा दिल्या . यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी ‘ विद्यार्थी उपस्थित होते .