अनाळा (माझं गांव माझं शहर ) परंडा तालुक्यातील अनाळा येथीलन्यू हायस्कूल शाळेची विद्यार्थीनी हिरकणी हनुमंत शिंदे हिने दि. २२ रोजी खंडेश्वर विदयालय , कात्राबाद येथे झालेल्या तालुका स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात उत्कृष्ट यश संपादन केल्याने तिची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जय जवान जय किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिव लक्ष्मणराव वारे , सहसचिव वसंत हिवरे यांनी अभिनंदन केले आहे .
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक जयकुमार भोरे यांनी हिरकणी शिंदे व पालक हनुमंत शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .