परंडा ,ता.२० (प्रतिनिधी )परंडा बसआगारात दोन दिवसापुर्वी नवीन पाच बसेस दाखल झाल्या आहेत. परंडा-पुणे वल्लभनगर मार्गावर शुक्रवार ता.१९ रोजी येथील बसस्थानक फलाटावरुन नवीन बसचा शुभारंभ जेष्ठ प्रवाशी,महिलांच्या हस्ते पुजन करुन सोडण्यात आली.नवीन बसेस दाखल होत असल्याने प्रवाशातुन समाधान व्यक्त होत आहे.
येथील बस आगारातुन तालुका परीसरात व लांब पल्ल्यासाठी खिळखिळ्या बसेस धावत आहेत.परंडा आगाराचे उत्पन्न चांगले असुनही बसआगारातुन लांबपल्ल्याच्या बसगाड्या बंदच आहेत.एसटी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाते.शहरासह दैनंदिन ग्रामीण भागात बसफे-या होत असतात.मागील अनेक वर्षापासुन नवीन बसेसची मागणी असुनही परंडा बसआगारास नवीन बसेस मिळाल्या नाहीत.त्यामुळे जुन्याच झालेल्या कांही खिळखिळ्या बसेस ग्रामीण भागात धावत आहेत.बुधवारी या आगारास नवीन पाच बसेस मिळाल्या आहेत.त्यापैकी दोन नवीन बस तुळजापूर नवराञ उत्सवासाठी पाठविल्या आहेत.परंडा बसस्थानकातुन सकाळी ११.३० वाजता नवीन बस परंडा-पुणे वल्लभनगर ही बस करमाळा,भिगवणमार्गे सोडण्यात आली आहे.या नवीन बसचे पुजन करुन चालक सचीन शहाणे,वाहक-कैलास वाघमारे यांचा प्रवाशांच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी वाहतुक नियञंक कल्याण कुंभार,कासीम मुलानी,व्हाईस आॕफ मिडिया जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद,तालुकाध्यक्ष मुजीब काझी,रिक्षासंघटना अध्यक्ष तनवीर पठाण,बाबा मोरवे,नय्युम शेख,हणमंत ऐतवाडे,सुरेश वाघमारे,सुनील थोरात,प्रभाकर थिटे आदिसह चालक वाहक,प्रवाशी उपस्थित होते.