पुणे(माझं गांव माझं शहर)पुण्यातील किक्की पब अँड बार येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष श्री. धनंजय भाऊ दळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे विद्यार्थी सेनेने धडक रेड टाकली. या पबमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली १७ ते २१ वयोगटातील नामांकित कॉलेजमधील मुला-मुलींना सरसकट दारू व अन्य नशेच्या वस्तू पुरवल्या जात असल्याचे उघड झाले. मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही पार्टी तात्काळ उधळून लावत तरुणाईला नशेच्या विळख्यात लोटणाऱ्या या ठिकाणाचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान शहराध्यक्ष दळवी यांनी सरकारवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “तरुण पिढी भविष्यातील महाराष्ट्र आहे. आणि ह्याच पिढीला पब-बारच्या नशेत अडकवून नष्ट करण्याचं काम सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे. शासन, प्रशासन आणि पोलीस यांना अशा पबची माहिती असते; पण पैशाच्या जोरावर ते मूक प्रेक्षक बनले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अशा प्रत्येक पबविरोधात आंदोलन करेल आणि तरुणाईचे भविष्य वाचवेल.” असही ते म्हणाले..