मिटर रिडींग उपलब्ध नाही – महावितरणचा अजब कारभार!

परंडा : परंडा तालुक्यातील नागरिकांना वीज बिलाबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मिटर रिडींग न घेता अंदाजे बिल देण्यात येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. “मिटर रिडींग उपलब्ध नाही” असा उल्लेख बिलावर दिसत असूनही रक्कम आकारली जात आहे.

त्यामध्ये सद्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा चालू आहेत महावितरणाचा लाईट येण्या जाण्याचा लपंडाव कायम चालू आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र असलेला रमजान उत्सव चालू आहे लाईट बंद करतात याकडे देखील दुर्लक्ष होत आहे.शहरात अनेकांकडे बिले थकीत आहेत महावितरण विभागातील कर्मचारी चिरीमिरी करतात व सवलत देतात सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतात याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित विभागाने त्वरित याकडे लक्ष देऊन योग्य रिडींगनुसार बिल द्यावे, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!