धाराशिव दि १४ (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व केंद्र शासनाच्या निकषानुसार शिक्षण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी शहरातील भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि राघुचीवाडी (५ किमीच्या आत) येथील दोन संभाव्य जागांचा विचार करण्यात आला. सदर दोन्ही जागांचा परीपुर्ण प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
बैठकीस जिल्हाधिकारी श्री. किर्तीकुमार पुजार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनक घोष, उपविभागीय अधिकारी श्री. ओमकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके व रिजनल विभाग सोलापूरचे श्री. उमाकांत जोशी उपस्थित होते.