रा गे शिंदे महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

परंडा दि.१७(माझं गांव माझं शहर) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कै रा गे शिंदे गुरुजी यांचे सुपुत्र तुळजापूर येथील रमेश शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उप प्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे अभिषेक शिंदे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमेश शिंदे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ सुनील जाधव संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मार्गदर्शन करत सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ कनिष्ठ भागातील प्राध्यापक सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्राचार्य डॉ महेश कुमार माने यांनी केले प्राचार्य डॉ सुनील जाधव संस्था सचिव संजय निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिव यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

error: Content is protected !!