माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा बसस्थानकात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित आयोजित कार्यक्रमात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजसेवक तथा साहित्यकार तु.दा गंगावणे, पञकार फारुख भाई शेख, विजयकुमार मेहेर, प्रमोद पाठक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किरण शहा, आगार प्रमुख श्री बालाजी मुळे , वाहतूक निरीक्षक श्री गोरख खराटे , सहायक कार्यशाळा अधिक्षक श्री संजय कांबळे वाहतूक नियंत्रक श्री संजय कदम चैतन्य, नवनाथ नलावडे, रवींद्र चव्हाण उमेश पालखे . प्रभाकर थिटे . इत्यादि उपस्थित होते.
मराठी भाषा हि सर्व संपन्नता व अभिजात भाषा असून समाजात या भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात अंगीकार करावा व मराठी साहित्य क्षेत्रात युवकांनी योगदान दिले पाहिजे असे आवाहन श्री तु दा गंगावणे यांनी केले. सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषा हि सक्तीची आहे परंतु ती उस्फुर्त प्रतिसाद देऊन वृद्धींगत करण्यासाठी स्वयंप्रेरणेने मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर केला पाहिजे असे मत आगार प्रमुख बालाजी मुळे यांनी मांडले. मराठी भाषेतील विविध अलंकारिक काव्यांचा उल्लेख करत वाहतूक नियंत्रक श्री कल्याण कुंभार यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच प्रवाशांचे आभार मानले .