आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने मराठा समाज बांधवाकडून मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार

परंडा (माझं गांव माझं शहर) शहरातील जय भवानी गणेश मंडळ आगरकर गल्ली येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देत ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महायुती सरकारचे प्रतिनिधी या नात्याने भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांचा आगरकर गल्ली येथील मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जय भवानी गणेश मंडळाचे सुहास मस्के, सुहास आगरकर, अण्णा लोकरे, पंकज नागरे, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष धनंजय काळे, राहुल आगकर, पत्रकार प्रकाश काशीद, ओंकार काशीद, उदय काशीद, कुणाल जाधव, आदित्य नागरे, सुजय जाधव, शंतनू कुलकर्णी, वैभव मस्के, योगेश मस्के, गणेश आगरकर, संतोष भालेकर, जयंत काशीद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिकेत काशीद, मयूर जाधव, आकाश काशीद, सिद्धार्थ काशीद तसेच इतर मान्यवर व मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!