मालेगाव- डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या ; आरोपीला त्वरित फाशी द्यावी.

परंडा-मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सोनार समाजातील एका तीन वर्षाच्या मुलीवर नराधमाने अत्याचार करून निघृण हत्या केली याप्रकरणी सदरील खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील सुवर्णकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान.डोंगराळे ता.मालेगाव येथील तीन वर्षाची कुमारी यज्ञा दुसाने या तीन वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर आरोपी शेखर संजय खैरनार या नराधमाने अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून निघृण हत्या केली सदरील प्रकार अत्यंत गंभीर आहे व परिणामी ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत व त्याबद्दल महाराष्ट्रभर निदर्शने दिली जात आहेत.सदरील घटनेचा सकल सुवर्णकार समाज जाहीर निषेध करीत आहे.सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, खटल्यासाठी निष्णात व अनुभवी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती तातडीने करावी.
आरोपीस कठोरातील कठोर फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने तात्काळ कार्यवाही करावी.या अमानुष कृत्याला कठोर शिक्षा हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी आवश्यक आहे. सोनार समाजाच्या हितासाठी न्याय न मिळाल्यास अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल.
निवेदनावर सराफ व सुवर्णकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर लंगोटे, मनोज चिंतामणी, विनोद चिंतामणी, नितिन महामुनी, अभिजित पेडगावकर, ओंकार शहाणे, मनोज शहाणे, गोकुळ पंडित, प्रमोद वेदपाठक, मदन महामुनी आदीसह इतर पदाधिकारी व समाज बांधवाची स्वाक्षरी आहे.

error: Content is protected !!