अनाळा (माझं गांव माझं शहर) दि .१७ परंडा तालुक्यातील अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा शाखा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात दि . १६ रोजी संपन्न झाला . अनाळा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एकमेव शाखा आहे . ही शाखा गेल्या अनेक वर्षापासून अनाळा येथील ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या इमारतीमध्ये चालू होती .
या इमारतीमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याने शाखेचे व्यवस्थापक रवी चौधरी यांनी वरिष्ठ कार्यालयाशी सतत पाठपुरावा करून या शाखेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अनाळा -वालवड रस्त्या लगत सुसज्ज अशा ‘दत्तात्रय हाईटस’ इमारतीत नवीन जागा उपलब्ध करून दिली .या ठिकाणी सुसज्ज सर्व सुख -सोयीयुक्त आधुनिक अशी शाखा उभारून त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली . हे स्थलांतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहाय्यक महा व्यवस्थापक , क्षेत्रीय व्यवस्थापक यशवंत वानखेडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला
स्थलांतर कार्यक्रमासाठी अनाळा गांवचे सरपंच ज्योतीराम क्षीरसागर , माजी जि . प . सदस्य दत्तात्रय पाटील ,परंडा पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन शिंदे , यशस्वी उद्योजक महादेव जाधव , रत्नापूरचे बिरमल तरंगे , सोसायटीचे चेअरमन दशरथ हिवरे , भाजपा ता . उपाध्यक्ष हरिभाऊ शिंदे प्रगतशील शेतकरी गोकुळ हिवरे , अशोक शिंदे , ॲड .शिवाजी पवार , पत्रकार आलिम शेख , अझहर शेख यांच्यासह महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पाथ्रुड चे शाखा व्यवस्थापक भरत भोसले , शेळगावचे तुषार माने , परंडा शाखा व्यवस्थापक आशिष शेळके यांच्यासह जागेचे व मालक ह .भ. प .अविनाश वामन महाराज , ह .भ. प . ईश्वर महाराज , भालचंद्र सावंत , अविनाश पाटील , यांच्यासह परिसरातील बँक खातेदार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . या वेळी बँकेच्या वतीने उत्कृष्ट खातेदार म्हणून तानाजी रोमन ,कोंडीबा केसकर , गोकुळ हिवरे , प्रवीण जोगदंड , प्रदीप बिडवे , भरत लांडे , शांतीलाल लांडे ,मल्हारी गरड , राहुल पवार , वसुदेव बावकर , अर्जुन जाधव ,बिरमल तरंगे , हनुमंत पाटील , श्रीनिवास देशमाने , महारुद्र जाधव , आदी खातेदारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .स्थलांतर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे रोखपाल दत्तात्रय पाटोळे, सहाय्यक शाखाधिकारी उमेश कोठावळे , संदीप शेळके , राजाराम गडकर , नवनाथ गडकर , सोमनाथ गडकर , बालाजी हजारे , शिवाजी खुरुंगे आदीनी परिश्रम घेतले .
प्रतिक्रिया –
१ ]अनाळा सह परिसरात १५ कि .मी . अंतरावर कोणतेही राष्ट्रीयकृत बँक नसल्याने व अनाळा बाजारपेठ मोठी असल्याने या बँकेमध्ये इतर सुविधा सह लवकरच परिसरातील सोने ठेवण्यासाठी लॉकर सुविधा व सोनेतारण कर्ज ग्राहकांच्या मागणीनुसार तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल – यशवंत वानखेडे , महाराष्ट्र ग्रामिण बँक सहाय्यक महाव्यवस्थापक लातूर
२ ] महाराष्ट्र ग्रामिण बँक स्थलांतर करण्यात यश आल्याने समाधान वाटले . ग्राहकांची होणारी गैरसोय आता दुर झाल्याने आम्ही पारदर्शक सेवा ग्राहकांना देणार आहोत -रवी चौधरी , शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामिण बँक , अनाळा ता . परंडा .