परंडा गटशिक्षण कार्यालयात शिपाई ते क्लार्क झालेले महानवर यांची वाढली ‘अरेरावी’ ;खातेनिहाय चौकशी करा.

परंडा दि.३० (प्रतिनिधी) – परंडा येथील गटशिक्षण कार्यालय, येथे कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक आप्पा महानवार यांच्या सततच्या गैरवर्तना व बेफिकीर कामकाजाच्या विरोधात माहिती अधिकारी कार्यकर्ता जीवन सुरेश खंडागळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
जीवन खंडागळे यांनी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आप्पा महानवार हे नियमितपणे कार्यालयात उशिरा उपस्थित राहतात तसेच अनेक वेळा विनाकारण अनुपस्थित राहतात. दूरध्वनीवर संपर्क साधल्यास ते कॉल उचलत नाहीत किंवा उचलल्यास अरेरावी वर्तन करून मी तुमचा नोकर आहे का?, हा शासनाचा मोबाईल नाही, माझे कोणी वाकडे शकत नाही अशा प्रकारे करू अपमानास्पद भाषा वापरतात.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, संबंधित अधिकारी कार्यालयीन कामकाजाबाबत अत्यंत निष्काळजी असून आवक-जावक टपाल स्वीकारणे किंवा देणे याबाबत टाळाटाळ करतात. तसेच कार्यालयात वेळेत उपस्थित राहात नाहीत आणि न सांगता बाहेर पडतात. या सर्व प्रकारांबाबत विद्यार्थ्यांचे पालक हे साक्षीदार आहेत.
खंडागळे यांनी आपल्या तक्रारीत असेही नमूद केले आहे की महानवार यांना प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांचे पाठबळ असल्याने त्यांचे मनमानी वर्तन सुरू आहे. त्यामुळे या महानवर यांची सखोल चौकशी करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. खंडगळे यांच्या तक्रारी च्या अनुशंगाने उपमुख्यकार्यकारी आधिकारी महानवर यांच्यावर काय कार्यवाही करतात याकडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!